About Drama

मायकेल फ्रायन ह्यांचे कोपनहेगन हे नाटक ब्रिटिश रंगभूमीवर १९९८ साली आले. त्याचे ३०० हुन अधिक प्रयोग लंडनच्या नॅशनल थिएटरमधे झाले. २००० साली ब्रॉडवेवर ३२६ प्रयोग , २००२ साली BBC ने त्यावर टेलिफिल्म केली. आपल्याला कदाचित युद्ध मानसिकदृष्ट्या खूप लांबची गोष्ट वाटते. दोन महायुद्धे रशिया, फ्रान्स वगैरे युरोपिअन देश आणि ब्रिटन, जपान यांनी अनुभवली. एखाद्या दुःस्वप्नासारखी त्या देशातील जनतेच्या मनात ती कोरली गेली आहेत

प्रख्यात अणुशास्त्रज्ञ आणि विसाव्या शतकातील पदार्थविज्ञानाच्या केंद्रस्थानी असलेल्या क्वांटम मेकॅनिक्सचा जनक डेन्मार्कचा नील्स बोर आणि त्याचा आवडता पट्टशिष्य जर्मनीचा वर्नर हायझेनबर्ग यांची दुसरे महायुद्ध ऐन भरात असताना १९४१ साली भेट झाल्याचे इतिहासाला ठाऊक आहे, पण या भेटीत नेमके काय घडले, काय चर्चा झाली, त्याचा जर्मन अणुबाँब निर्माण करण्याच्या प्रयत्नावर काय परिणाम झाला – याबद्दल एकवाक्यता नाही. इतिहासाला एकाद्या धुक्याप्रमाणे गूढ धूसर असणाऱ्या या भेटीवर मायकेल फ्रायनचे ‘कोपनहेगन’ हे नाटक आधारले आहे.

आपण थिअरेटिकल फिजिक्सचे विद्यार्थी नसलो तर आपल्याला बोर – हायझेनबर्ग – श्रॉडिंजर हे नोबेल विजेते शास्त्रज्ञ किवा न्युक्लीअर फिजिक्स अथवा क्वांटम मेकॅनिक्स ठाऊक असायचे कारण नाही. नाटकात हे शास्त्रज्ञ पात्रे म्हणून येतात, तेव्हा त्यांची काही संभाषणे या भाषेत होणे अपरिहार्य देखील आहे. या संभाषणांचा संबंध मानवजातीच्या भवितव्याशी व एका नव्या क्वांटम नितीशास्त्राशी पोहोचतो, हे समजल्यावर कान टवकारणे मात्र आवश्यक आहे.

Maharashtra Knowledge Corporation Limited (MKCL)

MKCL was promoted and established by the Department of Higher and Technical Education, Government of Maharashtra. It is an entrepreneurial endeavor to bridge the digital divide and the resultant knowledge and opportunity divide faced by the masses. It offers actionable knowledge and essential services to masses for socio-economic transformation. MKCL has emerged as a unique initiative focused on design, development and delivery of innovative e-Learning, e-Governance, and e-Empowerment technologies, solutions and services to an ever growing base of millions of users in public at large, Universities, Governments, and Communities. MKCL's mission agenda resonates well with the theme of the conference.

Venue

राम गणेश गडकरी रंगायतन, डॉ मूस मार्ग, घंटाळी,
तालावपाळीजवळ, ठाणे पश्चिम, महाराष्ट्र ४००६०२

Registration